26-07-2018 - 26-07-2018

रोटरी क्लब ऑफ पनवेल व आलोक क्लिनिक पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आपटे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे एका त्वचा रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन गुरुवार दिनांक २६ जुलै करण्यात आले होते. सदर शिबिरात आपटे गावातील व परिसरातील आदिवासी त्वचा रोग रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.या आरोग्य शिबिराचा २५० त्वचा रोग रुग्णांनी लाभ घेतला. या शिबिरात ५ कुष्ट रोगी रुग्ण आढळले. आलोक क्लिनिक चे संचालक डॉ. दिपक कुलकर्णी ,डॉ. प्रत्युष मोरे,डॉ. आत्मजा जाधव,डॉ.सायली म्हात्रे, यांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य ते उपचार केले. या रुग्णांसाठी आईं मेडिकल स्टोअर्स,यश फार्मा, एबेट हेल्थ केअर, ब्रिप्तान फार्मास्युटिकल ,सन फार्मा,या औषध विक्रेत्यांनी रुग्णांसाठी मोफत औषधे दिली. या शिबिरात कुष्ट रोग,एक्सीमा,सोरायसिस,खरूज, ना यटा, इत्यादी त्वचा रुग्ण मोठ्या संख्येने आढळले.ज्या रुग्णांना आधिक उपचाराची आवश्यकता होती,अश्या रुग्णांना डॉ.दीपक कुलकर्णी यांच्या आलोक क्लिनिक येथे उपचारासाठी बोलवण्यात आले आहे. हे त्वचारोग निदान व उपचार शिबीर यशस्वी करण्यासाठी, रोटरी क्लब ऑफ पनवेल चे अध्यक्ष रो. संतोष आंबवाने, सुनील लघाटे ,सुभाष देशपांडे,अमर म्हात्रे,विश्वनाथ म्हात्रे,शिरीष नांदेडकर, रमेश भोळे,सौ. आंबवाणे,सौ पवीता परमार,सौ.गीता कुलकर्णी, श्रीमती योगिता बापट,व आपटे प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व अधिकारी यांनी मोठे परिश्रम घेतले.

Project Details

Start Date 26-07-2018
End Date 26-07-2018
Project Cost 1000
Rotary Volunteer Hours 30
No of direct Beneficiaries 250
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category